Skip to main content

Posts

Showing posts from March, 2014

दूर

वाटतं , तुझं हे अपार दुःख  माझ्या बाहुपाशात  गोठवावं  माझ्या छातीवर  विझवावं पण  माझ्या बाहुपाशापासून  तू दूर आहेस  हजार शपथांनी  : दूर  : छंदोमयी  : कुदुमाग्रज 

मोर

चंद्र कलंडला तरी रात्र वेल्हालत आहे  फांद्यातून जलातून  स्वप्न निथळत आहे  मैफलीच्या अखेरीला  उभी कोपरयात वीणा  तारांतून तरी मंद  गीत पाझरत आहे  सोस जीवना , हा किती  अस्तित्वाच्या सीमेवर  पंखहीन लालसेचा  मोर आरवत आहे.  :मोर : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

हे रस्ते सुंदर

हे रस्ते सुंदर कुठेतरी जाणारे अन पक्ष्री सुंदर काहीतरी गाणारे तू उगाच बघतो फैलावाचा अंत किती रम्य वाटतो कौलारात दिगंत हे पक्षी सुंदर गाति निरर्थक गाणे मी निरर्थकातील भुलतो सौंदर्याने : म. म. देशपांडे.

समजावना !

किती सहज उतरवून ठेवलीस तू पिकलेली पानं हिरव्याच्या स्वागतासाठी ! मी मात्र उगीच केली खळखळ नि आता आपसुक होत असलेल्या पानगळीला घाबरते आहे ! किती सहज गृहीत धरलंस तू हिरव्याचं आगमन आणि गिळून टाकलीस पानगळ ! मला मात्र पानगळच गिळते आहे ! आपसुकच होईल हिरव्याचं आगमन हे मलाही समजावना ! : आसावरी काकडे

छंद घोटाळती ओठी

छंद घोटाळती ओठी नाचणभिंगरी त्याच्या साध्या ओळीसुध्दा झपाटती भारी डोक्यावर हिंदळता देह झाला गाणी एका कवीच्या डोळ्यांची डोळ्यांना माळणी असे कसे डोळे त्याचे मीही नवेपणी मेंदीओले हात दिले त्याला खुळ्यावाणी तेव्हापासूनचे मन असेच छांदिष्ट सये तुला सांगू नये अशी एक गोष्ट: त्याच्या ओळी माझ्या ओठी रुंजी घालू आल्या रानपाखरासारश्या तळ्यात बुडाल्या. : ना. धों. महानोर

शांतता

घराचे पाठीमागले दार उघडले... तेवढाच काय तो कडीचा आवाज - बाकी शांतता... - हिरवी शांतता... - गार शांतता... हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध नव्हे ... प...रि...म...ल अलगद उडणारी फुलपाखरें फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध पलीकडे ऊंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस त्या भोवती घारीचे भ्रमण शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप ...नंतर कोसळती शांतता पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग ...शांतता सजीव...गतिमान अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले एक अलवार बाळपीस वाऱ्याची मंद, नीरव झुळूक दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ ...शांतता मधुरलेली मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...त्यांचे ठसे जादूचे...गूढ पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण पुढे गहन..गगन शांततेत ऊभे माझे निवांत एकटेपण!  - शंकर वैद्य