Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

निशिगंध

नवल असे की  निशिगंधाचे फूल तिथे ते मला दिसावे  नवल पुन्हा की  अशा ठिकाणी निशिगंधाचे फूल असावे  सर्वांगाने रात्र पिणाऱ्या  भयाण त्या तळघरात खाली  वरचे पाणी झिरपुनि जेथे  हिरवी डबकी तयार झाली  सर्पकीटकावाचूनि दुसरे       जीवन जेथे व्यक्त ना व्हावे ! काळोखाचे कुजून तुकडे  दर्प जेथल्या हवेत साचे  उजेड गळतो वरून केवळ  मद्य व्हावया अंधाराचे  प्रकाश नाही विकास नाही       सुंदर सारे जिथे मरावे  नवल असे कि अशा ठिकाणी       निशिगंधाचे फूल फुलावे !! : निशिगंध  : हिमरेषा  : कुसुमाग्रज 
disawar satta king