Skip to main content

Posts

Showing posts from December, 2009

मेघ नसता

मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले ! गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा ? तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले ! एवढे नाजुक आहे वय तुझे माझ्या फुला रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले ! लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे हे तुझे नक्षत्रवैभव का धरेवर राहीले ? पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले ! भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले ! : संदीप खरे 

कविता

स्वप्नी दूर दिसावी कविता.. जाग येता उशाशी असावी कविता ..! घोट भर कधी प्यावी कविता .. अर्घ्य म्हणून द्यावी कविता ..! गज-यात सखीच्या माळावी कविता .. कज-यात तीच्या भाळावी कविता ..! प्रेमात तीच्या सुचावी कविता.. प्रेमभंगात खरी कळावी कविता ..! चंदनासम उगाळता झिजावी कविता .. कस्तुरीसम न दिसता गंधावी कविता..! जाता जाता बीजासम पेरावी कविता.. येताना फुलासम बहरावी कविता..! अनंतीच्या प्रवासी निघावी कविता.. पोटी पुन्हा कुणाच्या अंकुरावी कविता..!!! श्वास बनुनी हृदयी वसावी कविता.. प्राणवायू बनुनी शरीरी रुजावी कविता..!! 'मी' पणा बनुनी माजावी कविता.. नम्र राहुनी जगी गाजावी कविता..!! पावसात अश्रूंच्या भिजावी कविता.. चांदण्यात सुखाच्या हसावी कविता..!! मरता मरता अचानक जगावी कविता.. अन कुणाचे आयुष्यच व्हावी कविता..!! आयुष्यगीत गाता समजावी कविता.. मरण सामोरे येता उमजावी कविता..!! : विनायक

राहिले रे अजुन

राहिले रे अजुन श्वास किती ? जीवना, ही तुझी मिजास किती? आजची रात्र खिन्न तारयांची आजचा चंद्रही उदास किती? मी कसे शब्द थोपवू मागे हिंडती सुर आसपास किती? दुख्ख माझे....विरंगुळा त्यांचा मी करावे खुळे कयास किती? ओळखिचे कुणी तरी गेले ओळखिचा इथे सुवास किती? हे कसे प्रेम? या कशा आशा? मी जपावे अजुन भास् किती? सोबतीला जरी तुझी छाया... मी करू पांगला प्रवास किती??? कवी - सुरेश भट post scrap cancel
disawar satta king