आज रुसले आकाश
मुळी पाहीना वाकून ,
आज रुसलाही वारा :
पोर बसलें दाटून .
उन्हें बसली हटून
अंधाराच्या कोपऱ्यात ,
रागावल्या चंद्रम्याने
केला गट्टी फुचा बेत.
मन मुळीच रमेना
तुम्हा साऱ्यांच्या संगती :
संपविली भातुकली
म्हणूनच हातोहातीं;
मांडलेला खेळ आता
आता हवाच मोडाया :
जोडलेली नाती आता
आता हवीत तोडाया.
: भातुकली
: रंगबावरी
: इंदिरा संत
Comments
Post a Comment