बहरला पारिजात दारीं
फुले का, पडती शेजारी ?
माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणी जण तुला म्हणती
दुःख हें , भरल्या संसारी ! ।।
असेल का हें नाटक त्यांचे ,
मज वेडीला फसवायचे ?
कपट कां , करिती चक्रधारी ? ।।
वारा वाही जगासारखा
तिलाच झाला पाठीराखा
वाहतो , दौलत तिज सारी ! ।।
: गदिमा
: निवडक गदिमा
: संपादक : वामन देशपांडे
Comments
Post a Comment