विठ्ठलाचे पायीं , थरारली वीट
राउळींची घाट , निनादली ।।
ज्ञानोबाच्या दारीं , शरारे पिंपळ
इंद्रायणी -जळ, खळाळलें ।।
उठला हुंदका , देहूच्या वाऱ्यात
तुका समाधीत , चाळवला ।।
सज्जनगडात , टिटवी बोलली
समाधी हालली, समर्थांची ।।
एका ब्राम्हणाच्या , पैठणीपुरीत
भिजे मध्यरात्र , आसवांनी ।।
चालत्या गाडीत , सोडून पार्थिव
निघाला वैष्णव , वैकुंठासी ।।
संत - माळेतील, मणी शेवटला
आज ओघळला , एकादशी ।।
: ग दि मा
: निवडक गदिमा
: संपादन : वामन देशपांडे
Comments
Post a Comment