जाणतो मी अस्तकाली
या नभाचे सत्व सारे
मावळे सूर्यासवे .
जाणतो की धूसरावर
वाहती खग सांजवेळी
ती नभाची असावे.
गर्द झाडांच्या तळाशी
सावल्या हलती , नभाच्या
भितीचे थरकाप ते .
वादळे करती जळावर
वा गुहेतून नाद भीषण
हुंदके आलाप ते.
जाणतो या मद्यरात्री
जी तमावर प्रकट होते
तारकांची संपदा.
या नभाचा या तमाचा
तो प्रकाशाशी उद्याच्या
एक दुर्दम वायदा .
: अस्तानंतर
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
Comments
Post a Comment