कुठल्या कवितेसाठी न कळे
कुंठित झाले शब्द पुराणे ,
किरण लांबता लांबच गेले
डाळिंबांतच पडून दाणे.
पडून दिनमणी रंगी, व्यंगी
काय वेंचितां येइल हाती ?
दरीत घंटेचा ध्वनी भरतो ,
थरकापत पण दिव्यात ज्योती .
विचित्र आकारांच्या आडून
कोण हलवतो छातीवरचा
दगड नि झाडुन मोहर सारा
वेध घेतसे त्या कवितेचा ?
: कुठल्या कवितेसाठी
: नक्षत्रांचे देणे
: आरती प्रभू
Comments
Post a Comment