दोघांत आजला
अफाट अंतर
जुळून पाकळ्या
उडाल्या नंतर -
जीवनावाचून
जळला अंकुर
प्रश्नही राहिला
राहिले उत्तर !
संग्राम आजला
शोधतो जीवित
उरीचे ओघळ
दाबून उरात -
उठती भोवती
धुळीचे पर्वत
अखंड फिरते
वरून कर्वत !
वादळी रणात
करणे कोठून
नाजूक भावांचे
लालनपालन
तरीही केधवा
पडता पथारी
थडगी दुभंग
होतात अंतरी -
आठवे तुझ्या ते
प्रीतीचे मोहळ
आणि हो बिछाना
आगीचा ओहळ !
: तरीही केधवा
: विशाखा
: कुसुमाग्रज
अफाट अंतर
जुळून पाकळ्या
उडाल्या नंतर -
जीवनावाचून
जळला अंकुर
प्रश्नही राहिला
राहिले उत्तर !
संग्राम आजला
शोधतो जीवित
उरीचे ओघळ
दाबून उरात -
उठती भोवती
धुळीचे पर्वत
अखंड फिरते
वरून कर्वत !
वादळी रणात
करणे कोठून
नाजूक भावांचे
लालनपालन
तरीही केधवा
पडता पथारी
थडगी दुभंग
होतात अंतरी -
आठवे तुझ्या ते
प्रीतीचे मोहळ
आणि हो बिछाना
आगीचा ओहळ !
: तरीही केधवा
: विशाखा
: कुसुमाग्रज
Comments
Post a Comment