आली अमृताची आठवण
आली तुझी आठवण:
साठवाया रक्तामध्यें
डोळे घेतले मिटून ;
उभी अस्वस्थशी रात्र
गळ लावून चंद्राचा :
हरवले काही त्याचा
शोध घेतसे केव्हाचा;
फुलांतून मेघांतून
धुळींतून वाहे वारा :
हरवले कांही त्याचा
शोध घेतसे सैरावैरा;
हरवले त्यांचे कांही
काही घनदाट धुंद :
कसे सापडे त्यांना
केव्हाच ते डोळाबंद !
: डोळाबंद
: रंगबावरी
: इंदिरा संत
Comments
Post a Comment