प्रीतीविण प्रासाद गमे शून्य जीवाला
येईल चितेचीच कळा इंद्रमहाला !
प्रीतीविण पुष्पांतिल लोपेल सुगंध
प्रीतीविण ज्योत्स्नेत पहा दाहक ज्वाला
प्रीतीस नको तक्खत नको ताजमहाल
प्रीतीस हवी प्रीती , वृथा खंत कशाला ?
प्रीतीत फुले जीवन, प्रीतीत सुखाशा ,
प्रीतीविण दावानल ग्रासेल भवाला !
प्रीतीसह मागावर येईल वसंत
प्रीतीविण अन जीवन शोषेल उन्हाळा !
वक्षावर विश्रान्त तुझ्या होईल माथा
बाहुत तुझ्या रक्षक लाभेल दुशाला !
हातात सख्या , घालुनिया हात प्रवासा
ये संगती, प्रीतीवर ठेवून हवाला !
: प्रीतीविण
: विशाखा
: कुसुमाग्रज
येईल चितेचीच कळा इंद्रमहाला !
प्रीतीविण पुष्पांतिल लोपेल सुगंध
प्रीतीविण ज्योत्स्नेत पहा दाहक ज्वाला
प्रीतीस नको तक्खत नको ताजमहाल
प्रीतीस हवी प्रीती , वृथा खंत कशाला ?
प्रीतीत फुले जीवन, प्रीतीत सुखाशा ,
प्रीतीविण दावानल ग्रासेल भवाला !
प्रीतीसह मागावर येईल वसंत
प्रीतीविण अन जीवन शोषेल उन्हाळा !
वक्षावर विश्रान्त तुझ्या होईल माथा
बाहुत तुझ्या रक्षक लाभेल दुशाला !
हातात सख्या , घालुनिया हात प्रवासा
ये संगती, प्रीतीवर ठेवून हवाला !
: प्रीतीविण
: विशाखा
: कुसुमाग्रज
Comments
Post a Comment