कधीच वठला आहे नूर
देठ फुलांचा दुःखे उगाच ;
कधीच झडली परे पारवी
उगाच खुपते आहे चोच ;
कधीच झुकला आहे सूर
उगाच चढते तार गळ्याशी ;
कधीच हुकला आहे नेम
उगा रुते हा तीर उराशी ;
कधीच ओसरलेला पूर
उगाच वाळूंत शिंप हिमानी ;
जपते ..... जपते केव्हापासून
तांबूस लाडिक पाप इमानी.
: पाप इमानी
: जोगवा
: आरती प्रभू
देठ फुलांचा दुःखे उगाच ;
कधीच झडली परे पारवी
उगाच खुपते आहे चोच ;
कधीच झुकला आहे सूर
उगाच चढते तार गळ्याशी ;
कधीच हुकला आहे नेम
उगा रुते हा तीर उराशी ;
कधीच ओसरलेला पूर
उगाच वाळूंत शिंप हिमानी ;
जपते ..... जपते केव्हापासून
तांबूस लाडिक पाप इमानी.
: पाप इमानी
: जोगवा
: आरती प्रभू
Comments
Post a Comment