आज खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता करावी..
शब्दांच्या ओंजळीत तुझी
आठवण धरावी…..!!
आज सूर ताल सगळं काही विसरून जावं…
वाटतयं
आज थोडं मुक्त होउन गावं…
तुझ्या आठवणींची आज इथे मैफिल भरावी…
आज
खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता करावी….!!
पुन्हा तुला आधीसारखं
चोपाटीवर न्यावं…
रागावरचं औषध म्हणून दिसेल ते घ्यावं….
गजरा
माळताना पुन्हा तू गालात हसावी….
आज खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता
करावी….!!
वाटतयं तुझ्या बटांमधून पुन्हा हात फिरवावा..
ह्रदयाचा
तो आकार आपण वाळूमधून गिरवावा….
सहवासात तुझ्या मग वेळही ना
सरावी..
आज खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता करावी….!!
आज
खूप वाटतयं तुला जवळ घ्यावं…
गालावरच्या खळीकडे मन भरून पहावं…..
नेहमी
सारखी तीही भेट निराळीच ठरावी…
आज खूप वाटतयं तुज्यावर एक कविता
करावी…!!
Comments
Post a Comment