मला न वाटे कधी कळावे
कुठे चालली वाट चिमुकली
माळावरुनि , बनाखालुनी ,
गूढ निरागस कुठे झुकली .
मला न वाटे कधी कळावे
सुगंध कसला पुढील क्षणाला
आणि पाकळीवरी तयाच्या
फिका गडद वा रंगही कसला .
मला न वाटे कधी कळावे
का हे जीवन लहरी, मंथर ,
दॆपते, हुकते , भिते न लपते ,
थोडे आतुर थोडे कातर .
एक कळावे…। खेळच सारा
बघत दर्पणी चालायचा ,
उघड्या छ्परावरूनी चालत
निळ्या आभाळी पडावयाचा ….
: एक कळावे
: मेंदी
: इंदिरा संत
Comments
Post a Comment