माणूस होऊन जगणे थोडे जगुन पहा
देवपणा तू सोडून खाली उतर जरा .... मायबापा मायबापा
तू नसल्याचा भास पसरला चहूंकडे
दगड मातीच्या भिंतीमधुनी विहर जरा ..... मायबापा मायबापा
या जगण्यातून काढून घे हे जेहर जरा
उलट जरासा दुःखाचा हा प्रहर जरा ..... मायबापा मायबापा
रडता रडता या ओठांवर कधी तरी
हसण्याचाही थोडासा कर कहर जरा .... मायबापा मायबापा
सुखदुःखाचे झाले आता गाव जुने
या हसण्या रडण्यामधुनी तू बहर जरा ..... मायबापा मायबापा
अंगण होईल देव्हाऱ्यासम पावन हे
वेलीवरल्या पानफुलांतून डवर जरा ..... मायबापा मायबापा
तेवत राहो माणुसकीचा एक दिवा
आठवणीतून माणूस होवो अमर जरा ..... मायबापा मायबापा

Comments
Post a Comment