प्रारब्धा रे तुझे माझे
नाते अटींचे तटीचे,
हारजीत तोलण्याचे ,
प्रारब्धाचे सावधाचे ;
फासांतील तुझे पेच,
तुझे अंधारीचे घाव ,
सोडविणें नि सोसणे
हेच आयुष्याचे नांव.
जाळे फेकून रेशमी
देशी सुखाचे आभास :
सुख काचते भोगता :
जीव होतो कासावीस.
जेव्हा कढते दाहक
हृदयींचें रसायन
उधळिशी फुले तेव्हा
कसे निष्ठुर हासून;
जिद्द माझीही तशीच :
नाही लावलेली मान ,
जरी फाटला पदर
तुझे झेलिते मी दान ;
काळोखते भोवतालीं ,
जीव येतो उन्मळून
तरी ओठातून नाही
"तुला शरण .... शरण."
: प्रारब्धा
: बाहुल्या
: इंदिरा संत
नाते अटींचे तटीचे,
हारजीत तोलण्याचे ,
प्रारब्धाचे सावधाचे ;
फासांतील तुझे पेच,
तुझे अंधारीचे घाव ,
सोडविणें नि सोसणे
हेच आयुष्याचे नांव.
जाळे फेकून रेशमी
देशी सुखाचे आभास :
सुख काचते भोगता :
जीव होतो कासावीस.
जेव्हा कढते दाहक
हृदयींचें रसायन
उधळिशी फुले तेव्हा
कसे निष्ठुर हासून;
जिद्द माझीही तशीच :
नाही लावलेली मान ,
जरी फाटला पदर
तुझे झेलिते मी दान ;
काळोखते भोवतालीं ,
जीव येतो उन्मळून
तरी ओठातून नाही
"तुला शरण .... शरण."
: प्रारब्धा
: बाहुल्या
: इंदिरा संत
Comments
Post a Comment