“नांव सांग तव काय आणखी अंतरातला
भाव,
वनांतरी
शिरकांव कशाला? दूर राहिला गांव”
“मी नारीची जात आणखी धनवंताची
नात:
कुळशील
अन जात सोडली, जाऊ कशी नगरांत?”
“उबाळ वाटे बात : घालशी अस्मानाला
हात
मिळेल
का रानांत, साजणी, जिवाजिवाची
जात!”
“नागिण मी बेभान : चालले कुठे तरी हे गांन?
उतावीळ
हैराण धावते, कुठे केतकीपान?”
“कुणीकडे फिरणार : अशी तू कोमल आहे नार;
मंजुळवाणी
फार बोलशी वीणेवरची
तार!”
“वाट अशी खडकाळ, सख्या रे, रात अशी अवकाळ :
मी
आले लडिवाळ, सख्या, तू कर माझा प्रतिपाळ!
करू
नको नाराज, उदारा, कळे न का
आवाज?
भूल
पडे का आज जीवाला; जुनाच आहे साज”
“अधीर उडतो ऊर सारखा, मनी उठे काहूर :
हा
मैनेचा सूर वाटतो अन चंद्राचा
नूर”
“उदास कासावीस हिंडते – उदास कासावीस :
ओळखले
नाहीस काय रे, अरे तीच मी – तीच!
वाट
अशी खडकाळ, सख्या रे, रात अशी अवकाळ :
मी
आले लडिवाळ, सख्या, तू कर माझा प्रतिपाळ!”
: ना घ देशपांडे
Comments
Post a Comment